राज्य शासनाच्या शंभर व पाचशे रुपयाचा मुद्रांक बंद करण्याच्या धोरणाने मुद्रांक विक्रेत्यांचे तहसील समोर एक दिवसीय धरणे आंदोलन

0
48

जळगाव : राज्य शासनाने शंभर व पाचशे रुपयांचा मुद्रांक (स्टॅम्प पेपर) बंद करण्याचे धोरण असल्याचे ना. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी सांगीतले आहे. रु.100आणी रु500 चे स्टॅम्प पेपर बंद करुन ते बँकेतून फ्रँकीगच्या माध्यमाने देण्याचा प्रस्ताव आयजीआर ऑफीस पुणे मार्फत राज्य शासनाला पाठवण्यात आलेला आहे आणी तो येत्या मंत्री मंडळाच्या मिटींगमध्ये ठेवण्यात येणार आहे असे सांगीतले होते. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक बांधव यांनी याबाबत राज्यातील सर्व आमदार , खासदार, सर्व मंत्री महोदय यांना रितसर भेटून याविषयी माहिती निवेदन देण्यात आले परंतू सर्वांनी याबाबत आम्हास काहीही माहीती नाही असे. सर्वा समक्ष पदाधिकारी यांच्या समोर सांगीतले त्याचप्रमाणे संघटनेच्या वतीने आमचे अधिनस्त संबंधीत मुद्रांक जिल्हाधिकारी आणी राज्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी यांना देखील याबाबत लेखी निवेदन करण्यात आलेत पण सर्वांनी तोंडी असे सांगीतले की याबाबत आम्ही मंत्रालयात याबाबत कोणताही लेखी प्रस्ताव सादर केलेला नाही. त्यानंतर दस्तूर खुद उप नोंदणी महानीरीक्षक पुणे यांनी एका वृत्तपत्रात असे जाहीर केले की मुद्रांक बंद बाबत आम्ही कोणताही प्रस्ताव मंत्रालयात दिलेला नाही याउलट आम्हालाच मंत्रालयातून विचारणा होत आहे. त्यामुळे आम्ही कोणताही प्रस्ताव दिलेला नसल्याचे वृत्त पत्रात नमूद केले आहे. नामदार महसूल मंत्री यांनी स्टॅम्प पेपर बंद करुन त्या ऐवजी आता फ्रँकींग सिस्टीम ही सुरु होणार असुन यासाठी राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यास संमती दिलेली आहे. येत्या सहा महिन्यात स्टॅम्प पेपर पुर्णतः बंद होणार असल्याचे सभेत जाहिर केलेले आहे. त्यानंतर दि. 24 ऑक्टोबर 2023 रोजी स्टॅम्प संपले ? राज्याच्या मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाने मुद्रांक विक्रेते, अर्ज व दस्तलेखक हे नसले तरी फ्रँकींग व ईएसबीटीआर हे पर्याय आहे असे वृत्त प्रकाशीत करून मुद्रांक विक्रेते , अर्ज व दस्तलेखक यांचे राज्यशासनाच्या मदतीने शीतयुध्दाप्रमाणे यांचे खच्चीकरण करुन सामान्य जनतेसाठी केलेले आहे. म्हणजेच आई भाकर देत नाही अन बाप भिक मागू देत नाही अशी आमची परीस्थीती झाल्यामुळे राज्यातील सर्व मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्या उपासमारीचा प्रश्नः निर्माण झाल्यामुळे मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. राज्यातील बरेच मुद्रांक विक्रेत व दस्तलेखक यांच्या पुर्नवसनचा विचार न करता राज्य सरकारच्या महसूल मंत्री यांच्या या आडमुठेपणाच्या धोरणामुळे त्यामुळे संपुर्ण राज्यातील सर्व मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक व बॉन्ड रायटर यांच्यामध्ये तीव्र असंतोषा निर्माण झालेला असल्यामुळे राज्यातील सर्व संघटना एकत्र येऊन अखिल महाराष्ट्र मुद्रांक समितीचे गठन करण्यात येऊन राज्यात दि. 30 ऑक्टोबर 2023 रोजी एकदीवसीय लाक्षणीक धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. राज्य सरकारला आमची विनंती आहे की, रु.100आणी रु.500 चे मुद्रांक बंद करु नयेत, मुद्रांक विक्रेते यांच्या वारसांना परवाने हस्तांतरीत करुन मिळावे, मुद्रांक विक्रीचे कमीशन 3 टक्के ऐवजी 5 टक्के किंवा 10 टक्के अथवा सेवा शुल्क आकारण्यास परवानगी मिळावी, मुद्रांक विक्रीची मर्यादा 10 हजार रुपये वरुन 1 लाख रुपये पर्यंत मिळावी, भविष्यात नाईलाजाने मुद्रांक विक्री धोरणात बदल केल्यास फ्रँकींग मशीनव्दारे विक्री करणार असल्यास ती स्टॅम्प वेंडर मार्फतच केली जावी तसेच सर्व परवाना धारकांना फॅकींगसाठी आवश्यक असणारी सर्व मशीनरी विनामुल्य व निवाअट देण्यात यावी., नवीन प्रशासकीय इमारतीत मुद्रांक विक्रेते यांना कायमस्वरुपी बसण्याची जागा उपलब्ध करुन द्यावी त्याचप्रमाणे मुद्रांक विक्रेते अर्ज व दस्तलेखक बांधव यांचे पुर्नवसनासाठी महामंडळाची स्थापना करण्यात यावी. जळगाव जिल्हयातील तमाम नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, दि.30 ऑक्टोबर 2023 रोजी आमचे एकदीवसीय लाक्षणीक धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्यामुळे आपल्या होणा-या गैरसोईबद्दल दिलगीरी व्यक्त करतो कारण आज आमच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालयामुळे आम्ही फक्त 1 दिवसीय आंदोलन करत आहोत आम्ही आपल्या सेवेकरीता सदैव तहसील कार्यालय आवार येथे उन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता आपणास सेवा देत असतो. त्यामुळे तुम्ही आम्हास एक दिवसीय लाक्षणीक धरणे आंदोलनास सहकार्य करावे अशीही मागणी संबंधीतांनी केली आहे

Spread the love