सुनसगाव येथे आगेमोहळच्या हल्ल्यात एक जखमी !

0
3

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील रहिवासी पंढरीनाथ चांगो कंखरे ( धनगर ) बकऱ्यांना चारा घेण्यासाठी शेताच्या शिवारात बेलव्हाळ रस्त्याने जात असताना अचानक आगे मोहळाच्या मधमाशांनी हल्ला केला त्यामुळे बेसावध असलेले पंढरीनाथ कंखरे हे जखमी झाले.मधमाशांनी चेहऱ्यावर व पाठीवर डंख मारुन जखमी केले आहे त्यांच्यावर येथील डॉ सागर धनगर यांनी उपचार केले.विशेष म्हणजे १ मार्च रोजी सकाळी १० वाजता येथील चार महिलांना आगे मोहळाच्या मधमाशांनी हल्ला करून जखमी केले होते.येथे सहा दिवसांत आगे मोहळाच्या मधमाशांनी हल्ला केल्याची दुसरी घटना घडली त्यामुळे शेतकरी व शेतमजूर यांनी सावधानता बाळगावी असे बोलले जाते आहे.

Spread the love