शिरसाड जि. प. प्राथमिक शाळेच्या वेब पोर्टल चे म. गटशिक्षणाधिकारी शेख साहेब यांच्या हस्ते ऑनलाईन अनावरण

0
40

दिपक नेवे

यावल -कोरपावली येथे साकळी आणि दहीगाव केंद्राच्या वतीने दि.३१ रोजी झालेल्या संयुक्त शिक्षण परिषदेत शिरसाड जि. प. प्राथमिक शाळेच्या www.zpschoolshirsad.in या वेब पोर्टल चे गटशिक्षणाधिकारी नईम शेख साहेब यांच्या हस्ते ऑनलाईन अनावरण करण्यात आले. यावेळी दहीगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री विजय ठाकूर,साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. किशोर चौधरी, यावल केंद्राचे केंद्रप्रमुख शाकीर सर, साधन व्यक्ती राहुल पाटील व मच्छिंद्र पाटील तसेच दोन्ही केंद्राचे सर्व ग्रेडेड मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक आणि सर्व शिक्षक उपस्थित होते

यावेळी म. गटशिक्षणाधिकारी श्री. नईम शेख साहेब यांच्यासह सर्व उपस्थितांनी शिरसाड शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता धनंजय पाटील यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक टीम चे अभिनंदन केले. वेब पोर्टल अनावरण केल्यानंतर बोलताना शेख साहेब यांनी यावल तालुक्यात शाळेचे स्वतंत्र वेब पोर्टल असलेली शिरसाड ही पहिलीच शाळा असल्याचे नमूद करत शिरसाड सारख्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेची वेबसाईट ही एक खूप विशेष बाब असल्याचे मत यावेळी व्यक्त करत मुख्याध्यापिका सौ. संगिता धनंजय पाटील यांचे विशेष कौतुक केले. साकळी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. किशोर चौधरी यांनी शिरसाड ही आमच्या केंद्रातील शाळा असल्याचा अभिमान वाटतो असे मत व्यक्त केले. दहीगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. विजय ठाकूर यांनी वेब पोर्टल बद्दल सर्व टीम चे अभिनंदन करत शिरसाड शाळेच्या पूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या.

www.zpschoolshirsad.in या वेब पोर्टलची निर्मिती शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक श्री. दीपक वसंतराव चव्हाण सर यांनी स्वतः मुख्याध्यापिका आदरणीय सौ संगिता पाटील मॅडम यांच्या प्रेरक नेतृत्वातून आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याने केली आहे. या वेब पोर्टल वर शाळेची सर्वांगीण माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थी लाभाच्या योजना, विद्यार्थी माहिती, शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समिती, लोकसहभाग, भौतिक सुविधा, शाळा मूल्यांकन, शालेय व सहशालेय उपक्रम अशा विविध TAB चा समावेश या वेब पोर्टल वर करण्यात आला आहे. पोर्टल ला visit करून Feedback Tab वर आपली प्रतिक्रिया देण्याची व्यवस्था या ठिकाणी देण्यात आली आहे.

शाळेच्या स्वतंत्र वेब पोर्टल च्या अनावरणानंतर शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ दीपाली सुभाष इंगळे, उपाध्यक्ष श्री. गणेश बडगुजर, सदस्य सौ. कविता प्रमोद सोनवणे यांनी शिक्षक टीम चे विशेष अभिनंदन केले.

“आपल्या ग्रामीण भागातील शाळेची वेबसाईट पण असू शकते हा मुळात मोठा दुर्मिळ विचार आपण सत्यात उतरवला. याबद्दल अभिमानाने बोलावे की, ‘मी याच शाळेत शिकलोय.अशी काही सुखद अवस्था मनाची झाली आहे. सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन.” अशी प्रतिक्रिया शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा जे. टी. महाजन इंग्लिश मेडीअम स्कूल यावल चे प्रिन्सिपल श्री. भूपेंद्र बाळाराम राजपूत यांनी दिली.

वेब पोर्टल चे उद्घाटन झाल्यानंतर FACEBOOK आणि WHATSAPP सारख्या माध्यमातून शिरसाड शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता धनंजय पाटील, तंत्रस्नेही शिक्षक श्री. दीपक चव्हाण सर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक टीम वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Spread the love