इंटिमेट सीन दरम्यान भगवद्गीता दाखवल्याने ओपेनहायमर चित्रपट वादात, नेटकरी संतापले

0
11

ओपेनहायमर हा हॉलिवूडचा चित्रपट शुक्रवारी हिंदुस्थानात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण Oppenheimer या चित्रपटात इंटिमेट सीन दरम्यान भगवद्गीता दाखवण्यात आली आहे. चित्रपटातील या सीनवर प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला असून ट्विटरवर यासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

ओपेनहायमरमध्ये दाखवण्यात आलेल्या इंटिमेट सीनवर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. चित्रपटात एका दृश्यात भगवद्गीता दिसल्याने काही लोक प्रचंड संतापले आहेत. या चित्रपटाला R रेटिंग मिळाल्याने ओपेनहायमरच्या प्रीमियरपूर्वीच, या इंटिमेट सीनमुळे वाद निर्माण झाला होता. ओपेनहायमर हा नोलनचा पहिला चित्रपट आहे ज्यामध्ये इंटिमेट सीन आहेत. दिग्दर्शकाला या चित्रपटात जे. रॉबर्ट ओपेनहायमर (सिलियन मर्फी) यांचे जीवन आणि जीन टॅटलॉक (फ्लोरेन्स पग) सोबतचे भावनिक नाते चित्रित करणे महत्त्वाचे वाटले. काही लोकांना हे दृश्य आक्षेपार्ह वाटले.

या चित्रपटातील इंटिमेट सीन दरम्यान भगवद्गीता दाखवण्यात आल्याने प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. ट्विटर एका युजरने एका इंटिमेट सीनमध्ये भगवद्गीता दाखवल्याबद्दल ओपेनहायमरवर टीका केली.

चित्रपटात दाखवण्यात आल्याप्रमाणे ओपेनहायमरला संस्कृतची विशेष ओढ होती. त्यांना गीता वाचायची आवड होती. त्यांना धर्म आणि भाषा याविषयी नेहमीच जाणून घ्यायचे होते आणि ते जाणकार होते. पण त्यांनी स्वतःला कधीच पारंपरिक हिंदू म्हणवून घेतले नाही.

Spread the love