जळगाव जिल्ह्यात अपक्ष उमेदवारांनी वाढवले सर्वच उमेदवारांचे टेन्शन

0
30

जळगाव – : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. माघारीनंतर आता जळगाव जिल्ह्यातील 11 मतदार संघात लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात पक्षांतर्गंत बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांनी माघारी न घेतल्याने सर्वच उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.

जळगाव शहर मतदार संघ

भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री महाजन व अपक्ष शिवसेना ठाकरे गटाचे कुलभूषण पाटील, भाजपचे अपक्ष उमेदवार डॉ अश्विन सोनवणे.तर मनसे कडून डॉ. अनुज पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे..

जळगाव ग्रामीण मतदार संघ

महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यात थेट सामना होईल…

एरंडोल विधानसभा मतदारसंघ

महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील, महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे डॉ सतीश पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षल माने अपक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे डॉ. संभाजी पाटील, अपक्ष भाजपचे माजी खासदार एटी नाना पाटील, अजित पवार गटाचे अमित पाटील… त्यांच्यात प्रमुख लढत होणार आहे..

चोपडा विधानसभा मतदारसंघ

महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रा. चंद्रकांत सोनवणे विरुद्ध महाविकास आघाडी तर्फे शिवसेना ठाकरे गटाचे प्रभाकर सोनवणे अशी थेट लढत या ठिकाणी होणार आहे..

अमळनेर विधानसभा मतदारसंघ

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी अपक्ष , महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या तिरंगी लढत होणार आहे

पाचोरा विधानसभा मतदारसंघ

महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर पाटील महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी व अपक्ष भाजपचे अमोल शिंदे , राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार दिलीप वाघ अपक्ष अशी तिरंगी लढत होणार आहे..

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ

महायुतीचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उन्मेष पाटील यांच्या थेट लढत होणार आहे…

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ

महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडी तर्फे रोहिणी खडसे व अपक्ष विनोद सोनवणे यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळेल. ..

भुसावळ विधानसभा मतदारसंघ

महायुतीचे भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्याविरुद्ध काँग्रेस राजेश मानवतकर यांच्यात थेट लढत होणार आहेत.

रावेर मतदारसंघ

महायुतीचे भाजपचे अमोल जावळे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे धनंजय चौधरी… तर प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिल चौधरी तर वंचित बहुजन आघाडीच्या शमीभा पाटील, अपक्ष काँग्रेसचे दारा मोहम्मद, अशी लढत या मतदारसंघात होईल..

जामनेर मतदारसंघ..

महायुतीचे उमेदवार भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दिलीप खोडपे यांच्या थेट लढत होणार आहेत…

Spread the love