राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशन कालावधीत निलंबित करण्यात आले आहे. सभागृहात विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. जयंत पाटील यांना निलंबित करण्याची मागणी सत्ताधारी आमदारांनी केली होती. या संदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिवेशनात बोलू न दिल्याने जयंत पाटील संतप्त झाले. यावेळी त्यांनी जे शब्द उच्चारले ते असंदीय असून ते विधानसभा अध्यक्षांसाठी वापरण्यात आल्याचे सत्ताधारी आमदारांचे म्हणणे होते. त्यांनी प्रचंड गोंधळ केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात एक बैठक बोलवण्यात आली आणि जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले. यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला