गुजरातमधील एका ठगाने चक्क बनावट कोर्ट तयार करुन अनेक केसेसचा निकालही दिला आहे. मॉरिस सॅम्युअल क्रिस्टीअन असे या ठगाचे नाव असून तो गांधीनगर येथील रहिवाशी आहे. गेले साडेपाच वर्षे तो है कोर्ट चालवत होता. अनेक जमिनीसंदर्भातील केसेसमध्ये त्याने निवाडाही दिला आहे. आता स्थानिक न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी है बनावट न्यायालय बंद केले. तर कर्जन पोलिस ठाण्यात याबाबात गुन्हा नोंद करण्यात अला आहे. पोलिसांनी मॉरिसला अटक केली आहे. मॉरिस क्रिस्टीअन हा पेशाने वकील आहे, असे इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत म्हटले आहे.
क्रिस्टीअन याच्या विरोधात ठाकोर बाबुजी छन्नाजी यांनी तक्रार दिली. यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यांच्या एका प्रकरणात क्रिस्टिअन ने मध्यस्थी केली होती स्वतला कोर्टामधील मध्यस्थ असल्याचे सांगत त्यांची फसवणूक केली. अनेक प्रकरणात सरकारी जमीन त्रयस्थ व्यक्तीच्या नावे करण्याचे आदेश दिले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार तो आपत्या ऑफिसमध्ये फिर्यादींना बोलवून घेत असे व स्वतला न्यायाधीशांचा मध्यस्थ म्हणवून घेत असे. अशा फिर्यादींकड्न पैसे वसूल करुन बोगस न्याय देत असे. त्याने आपले ऑफिसही हुबेहुब कोर्टासारखे बनवून घेतले
होते. २०१९ मध्ये त्याने कोट्यवधी रुपयांची सरकारी जमीन आपल्या नावावर केली होती तसेच त्याने तसे बनावट आदेशही जिल्हाधिकारी कार्यालयातही दिले होते.