Jalgaon sandesh news network
जळगाव : आरपीआय (athawale gat) पक्षाचे राजु सुर्यवंशी यांच्यासह पाच जणांच्या एक वर्षासाठी हद्दपारीचे आदेश पोलिस अधिक्षक डॉ. रेड्डी यांनी काढले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या या आदेशानुसार पाचही जणांना दोन दिवसात जळगाव जिल्हा सोडून दुस-या जिल्ह्यात जायचे आहे.
स्थानिक पोलिस स्टेशनला त्यांना हजेरी लावायची आहे.
राजु सुर्यवंशी, किशोर सुर्यवंशी, आनंदा सुर्यवंशी, कैलास उर्फ छोटू भागवत सुर्यवंशी, रोहन सुर्यवंशी या पाच जणांचा या हद्दपारीत समावेश आहे. राज्याबाहेर जाणार असल्यास संबंधीत पोलिस स्टेशनला सुचीत करण्याचे देखील हद्दपारीच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.
राजु सुर्यवंशी विरुध भुसावळ शहर, भुसावळ बाजारपेठ आणि वरणगाव पोलिस स्टेशनला विविध गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला सर्वाधिक नऊ गुन्हे दाखल आहेत.