भुसावळ येथील डिगंबर नगरात पारायण सप्ताहाचे आयोजन !

0
39

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ –  येथील डिगंबर नगर, स्वामी समर्थ काॅलनी, जामनेर रोड, हिमालय पेट्रोल पंप मागे दि. २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत श्रीमद् भागवत कथा व नामसंकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात हभप सुरेश जावळे महाराज तळवेलकर हे कथावाचक राहणार असून आपल्या सुश्राव्य वाणीतून कथा निरुपण करणार आहेत तर दि. २५ रोजी हभप लक्ष्मण महाराज भुसावळ, २६ रोजी हभप प्रभाकर महाराज कुंड, २७ रोजी हभप सौ राधाश्री जोशी महाराज वराडसिम, २८ रोजी हभप श्री कृष्ण महाराज गोजोरे, २९ रोजी हभप दिपक महाराज शेळगाव, ३० रोजी हभप चंद्रकांत महाराज साकरी, १ रोजी हभप कु. भाग्यश्री महाराज पिंपरीकर व २ डिसेंबर दुपारी १ ते ४ या वेळेत महाप्रसाद व ५ ते ७ दिंडी सोहळा व ७ ते ८ भारुडांचा कार्यक्रम होईल आणि रात्री ८ ते १० हभप प्रथमचंद्र महाराज भुसावळ यांचे काल्याचे किर्तन होणार असून भजनी मंडळ गोजोरे व मुक्ताई महिला मंडळ डिगंबर नगर यांच्या सहकार्य मिळणार असून समस्त रहिवाशी व माऊली गणेश मंडळ स्वामी समर्थ काॅलनी यांनी या सप्ताहाचे आयोजन केले आहे. तरी सर्व भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

Spread the love