जळगाव – आज 1 ऑक्टोबर जागतिक शाकाहार दिवस यानिमित्ताने जळगाव चे शाखाहार प्रनेते रतनलाल जी बाफना यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सात वाजता सागर पार्क येथून त्याची सुरुवात झाली शंभर-दीडशे सायकल स्ववार उपस्थित होते रॅली कोर्ट चौक टॉवर चौक मार्गे गांधी उद्यान पर्यंत समारोप झाले या रॅलीमध्ये जळगावातील नामांकित डॉक्टर,, वकील, प्राध्यापक ,विद्यार्थी, कारखानदार, व्यावसायिक, सहभागी झाले होते तसेच दहा वर्ष ते 70 वर्षे वयापर्यंत ज्येष्ठ नागरिक महिला व बालके यांचा सहभाग होता . यावेळी विविध सायकल इव्हेंटमध्ये भाग घेतलेल्या सायकललिस्ट पुरुष व महिला यांचे सत्कार करण्यात आले, समारोपाच्या वेळी मंचावर आमदार राजूमामा भोळे ,महापौर जयश्री ताई महाजन, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भाऊ भंगाळे ,व्यापारी प्रतिनिधी दिलीप भाऊ गांधी व इतर नागरिक सहभागी झाले होते.












