जळगाव – :जळगाव ममुराबाद रस्त्यावरील उस्मानिया पार्क ते माळसादेवी दरम्यानच्या महामार्गावरील रस्त्याच्या कडेला म.न.पा जळगाव यांनी शहरातील वेस्टेज मटेरियल. कचरा. मातीचे ढिगारे. टाकल्याने व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट कारभाराने केलेल्या महामार्गावर ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवासी नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. गेल्या महिन्यापासून अनेक वाहनचालकांचे अपघात झाले. याबाबत जळगाव म.न.पा. व सार्वजनिक बांधकाम विभागाचे जबाबदार अधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करत होते. यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते.
https://youtu.be/XI1feLc9bGA
जळगाव पंचायत समिती सभापती जनार्दन कोळी यांनी याबाबत पालक मंत्री मा.गुलाबराव जी पाटील यांच्याकडे रस्त्याबाबत माहिती दिली असता. माननीय गुलाबराव जी पाटील यांनी डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना धारेवर धरले व त्यानंतर लगेचच बांधकाम विभाग जळगाव यांच्याकडून त्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून खड्डे बुजवण्यात आले. तसेच रस्त्याच्या कडेला टाकलेले वेस्टेज माती व मटेरियल उचलायला सुरुवात केली.याबद्दल पंचायत समिती सभापती जनार्दन कोळी यांचे नागरिकांनी आभार मानले आहे.












