धरणगाव येथील दहावीचे परीक्षा केंद्र क्रमांक ३४१५ पी.आर.हायस्कूल येथील केंद्रावर सर्व शिक्षक व कर्मचारी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून दहावीच्या परीक्षेला रोज काळ्या फिती लावून काम करत आहेत. यासंबंधीची माहिती केंद्र संचालक तथा शाळेचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी दिली.
सहायक केंद्र संचालक तथा उपमुख्याध्यापिका डॉ. आशा शिरसाठ, शिक्षक लोकशाही आघाडीचे तालुकाध्यक्ष श्री.डी. एस.पाटील, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रमुख श्री. जितेंद्र बोरसे, विजय दाभाडे तसेच महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक जगदीश पवार शिक्षक पी.डी. पाटील ,व्ही.टी. माळी आणि सर्व पर्यवेक्षकांनी दिनांक १४ मार्च नंतर होत असलेल्या दहावीच्या परीक्षेच्या काळात काळ्या फिती लावून जुन्या पेन्शन योजनेला पाठीबा दर्शवला आहे. महाराष्ट्र शासनाचे जुन्या पेन्शन योजनेबाबत लवकरात लवकर सकारात्मकता दर्शवावी,अशी मागणी संघटनेतर्फे डी.एस.पाटील यांनी केली आहे तर पी.आर.हायस्कूलचे ४४ च्या ४४ शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग हे शंभर टक्के संपात असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून फक्त दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे कामकाज आम्ही करत असल्याचे सांगितले.