पंकज महाविद्यालयात क्रीडा दिन उत्साहात साजरा.

0
42

हेमकांत गायकवाड

 

 

चोपडा :पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित ,पंकज कला व विज्ञान महाविद्यालयात मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पाठक हे अध्यक्षस्थानी होते तर डॉ. संजय पाटील हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते .

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. संजय पाटील यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला .भारतीय हॉकी संघाला मानाचे स्थान प्राप्त करून देण्यात मेजर ध्यानचंद यांचा सिंहाचा वाटा आहे.

प्राचार्य डॉ.किशोर पाठक यांनी मेजर ध्यानचंद यांच्या ऑलिंम्पिक मधील कामगिरीबाबत मार्गदर्शन केले हॉकीला सुवर्ण क्षण प्राप्त करून देण्यात मेजर ध्यानचंद यांचे मोलाचे योगदान आहे भारतीय हॉकी संघाला तीन वेळा सुवर्णपदक प्राप्त करून दिले हॉकी स्टिकची किमया अप्रतिम होती म्हणून त्यांना हॉकीचे जादूगार म्हणतात या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा.डॉ. विजय पाटील यांनी केले तर आभार प्रा. दिपक देवरे यांनी मानले या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love