
कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची व्यवस्था अतिशय कडेकोट असते. पण, कधी कधी प्रतिकूल परिस्थितीत पंतप्रधानांचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशीच एक घटना नुकतीच घडली आहे, जिथे पंतप्रधानांच्या निवासाला 20 हजार ट्रकनी वेढा दिला.
ही घटना कॅनडा या देशाची राजधानी ओटावा येथील पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या निवासस्थानाबाहेर घडली आहे. शनिवारी जस्टिन यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर 50 हजार ट्रक चालक आपल्या 20 हजार ट्रकसह दाखल झाले. त्यांनी निवासस्थानाबाहेर वेढा दिला.
या ट्रक चालकांनी ट्रुडो यांच्या घराबाहेर कॅनडाचे ध्वज फडकावयला सुरुवात केली. ते तिथे उभं राहून ट्रुडो यांच्याविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यांना अन्य आंदोलनकर्त्यांचीही सोबत मिळाली. या वेढ्यामुळे बिथरलेले ट्रूडो यांनी कुटुंबीयांसोबत गुप्त स्थानावर निघून जाण्यासाठी पळ काढला.
ट्रुडो यांनी काही काळापूर्वी कॅनडामध्ये कोरोना लसीकरणाची सक्ती केली होती. तसंच, ट्रक चालकांना अजिबात महत्त्वाचे नसलेले अल्पसंख्याक घटक असं म्हणून संभावना केली होती. या दोन्ही कारणांमुळे ट्रक चालक चिडले आणि त्यांनी थेट त्यांच्या निवासस्थानावर धडक दिली.












