जळगाव संदेश
पारोळा – : श प्र -येथे दि 5 रोजी दुपारी 3 ते 5 दरम्यान शहरातील दोन उच्चभ्रू वसाहतीत भर दिवसा दोन घरे फोडून किमान 6 ते 7 लाखाचा मुद्देमाल चोरी झाल्याने खळबळ माजली. या बाबत मिळालेल्या माहिती नुसार जगमोहनदास नगर मधील जिल्हा बँक कर्मचारी रवींद्र दौलतराव पाटील हे सकाळी 11 वाजता बँकेत आपल्या कर्तव्यावर गेले होते त्यांच्या पत्नी सुनीता पाटील ह्या एन ई एस हायस्कुल येथे कर्तव्यास असून त्याही दुपारी 3 वाजता शाळेत गेल्या होत्या त्या ठीक 5 वाजता घरी परत आल्या असता घराचा दरवाजा उघडा दिसून कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी आपले पतींना सदर माहिती दिली यावेळी घरातील दोन्ही बेडरूम मधील गोदरेज कपाटे फोडून त्यातील एक 52 ग्राम ची सोन्याची चेन तसेच 22 ग्राम चे सोन्याचे दागिने ,चांदीचा ग्लास व काही चांदीचे तुकडे असा किमान 4 लाखाचा ऐवज चोरी झाल्याचे समजले.
तर दुसऱ्या घटनेत याच वसाहती च्या पुढे उंदिरखेडा रस्त्यावरील वर्धमान नगर मध्ये मणिपूर येथे फौजि असलेले प्रकाश नामदेव पाटील मूळ राहणार खोरदड ता धुळे हे आपली पत्नी वैशाली सोबत दि 4 रोजी घराला कुलूप लावून पाचोरा येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते ते दि 5 रोजी 5 वाजता घरी परतले असता त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसल्याने त्यांना चोरी झाल्याची शँका आली यावेळी त्यांनी घरात पाहिले असता गोदरेज कपाट फोडून त्यातील सोन्याचे दागिने चांदीचे तुकडे असा किमान दीड ते दोन लाखाचा ऐवज चोरून नेला.विशेष म्हणजे सदर दोन्ही वसाहती मध्ये कायम वर्दळ असते त्यात जवळ जवळ घरे असताना भर दिवसा घरे फुटल्याने या बाबत आरोपीने सदर घरावर पाळत ठेऊन भर दुपारी आपले काम फत्ते के.










