पटेल समाज कब्रस्तान कमेटीच्या अध्यक्षपदी अय्युब पटेल तर उपाध्यक्षपदी ईकबाल पटेल सचिवपदी हाजी तुकमान पटेल .

0
12

Praveen Meghe
यावल ( प्रतिनिधी ) येथील पटेल समाज कब्रस्तान कमेटीच्या अध्यक्षपदी अय्युब गफुर पटेल व सचिवपदी हाजी लुकमान बिस्मिल्ला पटेल यांची फेरनिवड तर उपाध्यक्षपदी ईकबाल ईसा पटेल, हिलाल हमीद पटेल यांची निवड करण्यात आली आहे. यावल येथे शहरातील आयशानगर येथे कमेटीचे अध्यक्ष अय्युब पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कमेटी विश्र्वतांची वार्षीक बैठक संपन्न झाली , या बैठकीत पटेल समाज बांधवांच्या कब्रस्तानातील विविध समस्या अडीअडचणी समाजकंटकाकडून कब्रस्तान परिसरातुन वारंवार होत असलेली वृक्षांची तोड थांबविण्यासाठी योग्य तो निर्णय संदर्भात व याशिवाय विविध विषयी सखोल चर्चा करण्यात आली . यावेळी कब्रस्तान कमेटीच्या २०२२ते २०२३या वर्षा करीता ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली ती पुढील प्रमाणे अध्यक्ष अय्युब जी पटेल , उपाध्यक्ष ईकबाल ईसा पटेल व हिलाल हमीद पटेल , सचिव हाजी लुकमान बिस्मिल्ला पटेल , खजिनदार राजु अय्युब पटेल , सदस्य हाजी समद हुसैन पटेल , हाजी ईसा गुलझार पटेल , कमरोद्दीन निजामोद्दीन देशमुख , राजु हाजी अजीज पटेल , मुक्तार ईब्राहीम पटेल , आमंत्रीत सदस्य शकील सफदर पटेल यांची निवड जाहीर करण्यात आली आहे . नुतन पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे कमेटीचे अध्यक्ष अय्युब पटेल यांनी कमेटीच्या वतीने स्वागत केले आहे .

Spread the love