विमान उड…मोदी उड…शपथविधी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विदेश दौरे सुरू

0
14

नरेंद्र मोदी हे तिसऱयांदा एनडीएच्या पाठिंब्यावर पंतप्रधान बनले आहेत. पंतप्रधानपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला नाही तोच ते इटली दौऱयावर गेले आहेत. पंतप्रधान मोदींनी अनेक देशांचे दौरे केले आहेत, परंतु यात एक खास बाब म्हणजे मोदींनी आधीच्या पंतप्रधानांपेक्षा चीनचे दौरे जास्त केले आहेत. मोदींनी आपल्या पहिल्या कार्यकाळात पाचवेळा चीनला भेट दिली. सर्वाधिक वेळा चीनला भेट देणारे ते हिंदुस्थानी पंतप्रधान ठरले आहेत.

पंडित नेहरू यांनी चीनचा केवळ एक दौरा केला. राजीव गांधी एक, नरसिंह राव एक, अटलबिहारी वाजपेयी एक, मनमोहन सिंग यांनी दोन दौरे केले. चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग तीन वेळा हिंदुस्थान दौऱयावर आले. तरीही हिंदुस्थान -चीन देशांमधील संबंध सुधारले नाहीत. उलट ते मोदींच्या काळात जास्त बिघडले आहेत. चीनने 2020 मध्ये गलवानमध्ये घुसखोरी करून दोन्ही देशांमधील संबंध बिघडवले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ते 2019 या काळात 57 देशांचे एकूण 92 दौरे केले, तर 2019 ते 2024 पर्यंत 28 देशांचे एकूण 43 देशांचे दौरे केले. पंतप्रधान मोदी हे सर्वात जास्त 8 वेळा अमेरिका दौऱयावर गेले. मोदी हे 25 वर्षांत सर्वात जास्त परदेश दौरे करणारे हिंदुस्थानी पंतप्रधान ठरले आहेत. मोदींनी दोन कार्यकाळात एकूण 135 दौरे केले. यात 66 देशांचा समावेश होता, तर मोदी यांच्या आधीचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दोन कार्यकाळात 94 दौरे केले असून यात 43 देशांचा समावेश होता.

मोदींनी नेपाळचा पाच वेळा दौरा केला. बांगलादेशचा दोन वेळा, म्यानमारचा दोन वेळा, भूतानचा तीन वेळा, श्रीलंका तीनवेळा, मालदीवचा दोनवेळा, अफगाणिस्तानचा दोन वेळा, पाकिस्तानचा एकदा दौरा केला.

इस्रायल, फिलिस्तीन, रवांडा, बहरीन, पापुआ न्यू गिनी, मंगोलिया या देशांत आतापर्यंत कोणतेही हिंदुस्थानी पंतप्रधान गेले नव्हते, परंतु मोदी या देशांतही जाऊन आले. पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत सर्वात जास्त विदेश दौरे केले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या कार्यकाळात अनेक देशांचे दौरे केले. यात पाकिस्तानला 16 वर्षांनंतर, श्रीलंकेला 30 वर्षांनंतर, नेपाळला 17 वर्षांनंतर, यूएईला 30 वर्षांनंतर, मिस्रला 26 वर्षांनंतर, ग्रीसला 40 वर्षांनंतर भेट देणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत.

Spread the love