प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – येथून जवळच असलेल्या अकलूद ता. यावल गावा जवळ स्कूल बसच्या चाकाखाली आल्याने पायी चालणाऱ्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या बाबत माहिती अशी की ,भुसावळ – अंजाळे रस्त्यावर असलेल्या पोदार स्कूल मध्ये शिक्षण घेण्यासाठी परिसरातून स्कूल बस ने विद्यार्थी ये – जा करतात. नेहमी प्रमाणे दि.२७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पोदार शाळेची बस क्रमांक एम एच १९ बी एच ०६१३ चा चालक अनिल भगवान सपकाळे रा.अंजाळे ता.यावल हा स्कूल बस मागे घेत असताना बस च्या मागे येणारा पंडित मोहन बादशहा (धनगर) वय ५५ रा कासवा ता यावल याला क्लिनर साईट खाली दाबून डोक्याला मार लागून मयत झाला. या बाबत सुरेश खैरनार पोलीस पाटील अकलूद – पाडळसे यांनी फिर्याद दिली असून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणे अंमलदार मोती पवार हे करीत आहे.