प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील शिंदी व बोदवड तालुक्यातील विचवा ,भानखेडा परिसरामध्ये माघील काही दिवसांपासून महावितरणची विद्युत तार चोरी जाण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सदर तार चोरी गेल्यावर नवीन तार टाकण्यात येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दिनांक ०९.११.२०२५ रोजी मौजे विचवे गावातील भरत पंढरी भोळे यांच्या शेतातून तार चोरी गेली होती. शिंदी वितरण केंद्र येथील सहाय्यक अभियंता श्री आखरे यांनी सदर तक्रार बोदवड पोलीस स्टेशन येथे दाखल केल्यावर पोलीस प्रशासनाकडून योग्य दखल घेण्यात आली आहे. सदर भागामध्ये नेहमी तार चोरीला जात असल्यामुळे योग्य तपासणी करण्यासाठी दिनांक ०३.१२.२०२५ रोजी बोदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. अरविंद भोळे यांनी स्वता घटनास्थळाची पाहणी केली व सबंधित कर्मचारी व पोलीस पाटील यांना सुद्धा सूचना दिल्या आहे. सदर पाहणी दरम्यान महावितरणचे कर्मचारी सोबत होते सदर घटनांना आळा बसविण्यासाठी योग्य तपास करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.












