जळगाव शहरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; पोलीसात तक्रार दाखल

0
13

जळगाव – शहरातील एका भागात राहणारी ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पाळवून नेल्याची घटना बुधवारी सायंकाळी समोर आली आहे.

याप्रकरणी गुरुवारी २० जून रोजी मध्यरात्री दोन वाजता जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात ११ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. दरम्यान बुधवारी १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता नातेवाईकांकडे भेटायला जाते, अशी सांगून ती घरातून निघून गेली. दरम्यान तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत तिला फूस लावून पळवून नेले आहे. अशी तक्रार पिडीत मुलीच्या तिच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्यानुसार गुरुवारी २० जून रोजी मध्यरात्री २ वाजता जळगाव तालुका पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

Spread the love