सुनसगाव येथे पोलीस निरीक्षकांनी दिली माहिती अधिकार दिनानिमित्त नागरीकांना माहिती !

0
45

भुसावळ – येथील ग्रामपंचायत कार्यालयात माहिती अधिकार आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबनराव जगताप साहेब यांनी सुनसगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत गावातील नागरिकांना माहिती दिली .त्या अगोदर पत्रकार जितेंद्र काटे सर यांनी २८ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात येतो तसेच माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर करू नये असे आवाहन केले. तसेच पो. नि. बबनराव जगताप साहेब यांनी दि.२८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी येत असल्याने शासनाने दिलेल्या आदेशानुसार दि. २७ रोजी सभा घेऊन आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे महत्त्व काय आहे हे सांगीतले. तसेच माहिती अधिकार कायद्याचा वापर चांगल्या कामासाठी करावा. गावपातळीवर किंवा पोलीस स्टेशन मध्ये योग्य कामासाठी माहिती अधिकाराचा वापर केल्यास काही हरकत नसते मात्र विनाकारण वाईट उद्देशाने माहिती अधिकाराचा वापर करणे टाळावे असे सांगून एक गाव एक गणपती चे विसर्जन शांततेत करण्याचे व गावातील घरगुती गणपती चे विसर्जन करताना गावातील कार्यकर्ते मंडळीने सहकार्य करावे असे पोलीस निरीक्षक बबनराव जगताप साहेब यांनी सांगितले. यावेळी पोलीस पाटील खुशाल पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सतिश पाटील , विकासो चेअरमन सुदाम भोळे, माजी ग्रामपंचायत सदस्य एस आर पाटील सर विठ्ठल मंदिर संस्थान चे चेअरमन चंद्रकांत भोळे, खजिनदार लिलाधर पाटील, ग्रामसुरक्षा दलाचे एकनाथ सपकाळे, हर्षल पाटील, रोहिदास पाटील, योगेश पाटील, तुकाराम पाटील विनायक कंखरे, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र मिस्तरी, युवराज पाटील, बुथ प्रमुख रविंद्र पाटील, तसेच भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे एएसआय विठ्ठल फुसे, मेजर विनोद पाटील, चालक राजू काझी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार जितेंद्र काटे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कर्मचारी पंकज पाटील व जितेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.

Spread the love