चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाचा अजब कारभार ; अपघात ग्रस्त दुचाकी वाहन परस्पर भंगार मधे विकल्याचा प्रकार उघडकिस.

0
12

चोपडा – शहरातील समता नगर भागातील नाल्याच्या रस्त्यालगत अपघात ग्रस्त नऊ दुचाकी मोटरसायकल भंगार दुकानदाराकडे तुडवल्या जात असल्याची माहिती चोपडा शहर पोलिसांना मिळाली. त्याचा तपास करण्यासाठी चोपडा शहर पोलिस स्टेशन चे कर्मचारी रात्री गेले असता त्या मोटरसायकली ह्या चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक कावेरी महादेव कमलाकर यांच्या कडून भंगार म्हणून विकत घेतले असल्याचे सांगण्यात आले. या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ग्रामीण पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना विचारणा केली असता अपघातग्रस्त 9 दुचाकी एकत्रित वीस हजार रुपयाला विकल्या आहेत. त्या पैशातून पोलिस स्टेशनचा दुरुस्तीचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु दुचाकी विकत घेणाऱ्याने 9 वाहनासाठी 38 हजार रुपये फोन पे वर मेडम ने सांगितलेल्या नंबर वर भंगार घेणाऱ्या जुनेद अब्दुल मुत्तलिब मोमीन रा.समता नगर यांनी पाठवले आहे .जेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारले की, परस्पर गाड्या विकण्याचा अधिकार आहे का? यावर त्या पत्रकारांवरच भडकल्या अन् शाब्दिक वाद करत बातमी लावू नका, नाही तर तुमच्या वर गुन्हे दाखल करेल, अशी धमकी दिली. मी भंगार विकल्याचे स्पटीकरण काय द्यायचे ते मी वरिष्ठांना देईल.

माझा भाऊ पण एका दैनिकाचा संपादक आहे. तुमच्या बद्दल त्याच्या कडे तक्रार करेल. अश्या प्रकारच्या धमक्या देऊन पत्रकाना धमकवण्याचे काम केले आहे .याबद्दल उपविभागीय अधिकारी कृषिकेश रावळे यांना माहिती दिली असता घडलेल्या संबंधित प्रकारची चौकशी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. पोलिस स्टेशन दुरुस्ती साठी अपघाती वाहन विक्री करणाऱ्या पोलिस निरीक्षक यांनी पत्रकारांशी चांगला संवाद साधणे व पारदर्शी माहिती देणे आवश्यक असताना त्यांनी धमक्या देणे कितपत योग्य आहे.
भंगार दुचाकी भंगार मध्ये विकण्याची त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेतली आहे काय?, घेतली असेल तर सदर रक्कम पोलीस विभागाच्या खात्यात जमा केले आहेत काय?,जाहीर लिलावप्रक्रिया राबवून विकल्या आहेत का? की मर्जीतील एकास अधिकार वापरून विकून टाकल्या आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित आहेत.
पोलिस स्टेशन दुरुस्ती साठी वाहन विक्री करणाऱ्या पोलिस निरीक्षक हे पैश्या साठी गुन्हेगारांना सोडून देतील का?अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे

Spread the love