लग्नाचे अमिष दाखवत वकीलाकडून पक्षकार महिलेवर अत्याचार, पोलीसात गुन्हा दाखल

0
35

जळगाव – लग्नाचे आमिष दाखवत एका महिलेवर अत्याचार केल्याबाबत बुधवारी जिल्हापेठ पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील एका भागात ३६ वर्षीय महिला वास्तव्याला आहे. अॅड. निखिल भोलाणे (वय ३५, रा. जळगाव) याने महिलेच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन लग्नाचे आमिष दाखवत १५ मार्च २०२३ ते १५ जानेवारी २०२४ दरम्यान महिलेवर वेळोवेळी अत्याचार केला.

घटस्फोट झालेल्या महिला मार्गदर्शनासाठी वकीलाकडे गेल्या होत्या. यावेळी त्या महिलेला वकीलाने लग्नासाठी मागणी घातली. महिला अशिक्षीत असल्याचा फायदा घेत वकीलाने महिलेला एका मंदिरात घेवून गेला. याठिकाणी अभिषेक करुन त्यानंतर ते दोघे वकीलाच्या घरी आले. तेथे वकीलाच्या आईसमोर त्याने महिलेला मंगळसूत्र घालून विवाह केला. त्यानंतर वेळोवेळी महिलेवर दि. १५ मार्च २०२३ ते दि. १५ जानेवारी २०२४ पर्यंत अत्याचार केले. याप्रकरणी वकीलाविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love