प्रतिनिधी ( जितेंद्र काटे ) – भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील गोठ्या प्रकरणी उपसरपंच एकनाथ सपकाळे यांनी चौकशीची मागणी केली असल्याने एकच खळबळ उडाली असून गोठ्या प्रकरणी चौकशी झाल्यास ज्या शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे सादर करुन गोठ्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला अशा लाभधारकांवर पोलीस कारवाई होण्याची शक्यता असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली असून या बाबत उपसरपंच एकनाथ सपकाळे यांनी सांगितले की जर अधिकारी चौकशी करणार नाही तर पोलीसात तक्रार करून गरजू लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले आहे. तसेच या संदर्भात मासिक सभेत ग्रामपंचायत अधिकारी यांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला होता मात्र तरीही काहीही कार्यवाही करण्यात आली नाही तसेच गोठ्याचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर केली त्यावेळी किमान ग्रामपंचायत सदस्यांना विचारना करुन व खरोखर गुरेढोरे आहेत की नाही याची खात्री करून सरपंच व ग्रामसेवक यांनी सही शिक्के करणे गरजेचे होते त्यामुळे कोणत्याही प्रकारची खात्री न करता ही प्रकरणे मंजूर करण्याचा अट्टाहास कशासाठी असा प्रश्न उपसरपंच एकनाथ सपकाळे यांनी उपस्थित केला असून संबंधीतांवर लवकरच पोलीस कारवाई होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात असून गेल्या पाच वर्षांत कोणी कोणी बोगस गोठे तयार करून शासनाचा पैसा लुटला याची चौकशी करण्यात यावी तसेच त्या बोगस लाभार्थ्यांची यादी लवकरच जाहीर करण्यात येईल असे ” जळगाव संदेश ” शी बोलताना उपसरपंच एकनाथ सपकाळे यांनी सांगितले आहे.











