प्रभू राम हे केवळ पौराणिक पात्र; राहुल गांधी यांचे अमेरिकेतील विद्यापीठात वक्तव्य

0
25

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठामध्ये भाषण करताना प्रभू श्रीराम हे “पौराणिक पात्र” आहेत, असे संबोधित केले.

त्यांच्या या वक्तव्यानंतर भारतातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजपने राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ही हिंदुविरोधी मानसिकता असून रामविरोध आणि हिंदूविरोध हीच काँग्रेसची ओळख आहे, अशी भाजपने केली आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

ब्राउन विद्यापीठातील वॉटसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स येथे राहुल गांधी यांच व्याख्यान झाले. यावेळी “धर्मनिरपेक्ष राजकारणाची संकल्पना हिंदू राष्ट्रवादाच्या पार्श्वभूमीवर कशी मांडावी?”

या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना त्यांनी ते म्हणले की, “आपल्या सर्व पुराणकथांतील पात्रे- जसे की प्रभू राम – क्षमाशील, करुणाशील होते. भाजप जे मांडते ते खरे हिंदुत्व नाही. हिंदू विचार अधिक सर्वसमावेशक, सहिष्णु, प्रेमळ व मुक्त आहे. महात्मा गांधी हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहेत.”

भाजपवर टीका करत ते म्हटले की, “भाजप एक fringe ग्रुप आहे. ज्यांच्याकडे सध्या सत्ता आणि संपत्ती आहे, पण ते भारतीय बहुसंख्य विचारांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया

राहुल गांधींच्या या विधानावर भाजपने जोरदार टीका केली असून, सोशल मीडियावर अनेक भाजप नेत्यांनी राहुल गांधी यांचा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसच्या ‘रामविरोधी’ भूमिकेवर सवाल उपस्थित केले आहेत.

भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी X (ट्विटर) वर लिहिले आहे की, “प्रभू राम आणि हिंदू धर्माचा अपमान करणे हे काँग्रेसचे वैशिष्ट्य झाले आहे.

ज्यांनी रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले, मंदिर बांधणीला विरोध केला, ‘हिंदू दहशतवाद’ ही टर्म वापरली, ते आता म्हणतात राम पौराणिक होते. राहुल गांधी व सोनिया गांधी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गैरहजर होते – हीच त्यांची मानसिकता दर्शवते.”

भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले, “राम केवळ एक पौराणिक पात्र – ही काँग्रेसची हिंदू धर्माबाबतची घृणास्पद भूमिका आहे. निवडणुकीत सनातन प्रेमाचे नाटक, पण प्रत्यक्षात हिंदू श्रद्धेचा अपमान!”

भाजपचे सी. आर. केशवन म्हणाले की, “2007 मध्ये UPA सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करत म्हटले होते की रामाच्या अस्तित्वाचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. त्यांच्या सहयोगी पक्ष DMK नेही रामाच्या अभियंता असण्यावर उपहास केला होता.”

काँग्रेसची भूमिका

काँग्रेसकडून अद्याप या टीकांवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु पक्षाचे समर्थक राहुल गांधींचे वक्तव्य “हिंदू धर्माच्या सहिष्णुतेचे महत्त्व” अधोरेखित करणारे असल्याचे म्हणत आहेत.

राहुल गांधींनी त्याच भाषणात भाजपचा हिंदुत्वाचा दावा हिंदू धर्माशी संबंधित नसल्याचे सांगून भाजपच्या राष्ट्रवादावरही सवाल उपस्थित केले होते.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसविरोधात भाजपने आपली हिंदू समर्थक भूमिका अधिक आक्रमकपणे मांडण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान,काही दिवसांपुर्वीच एका न्यायालयाने सावरकरांबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना फटकारले होते. त्यानंतर या वक्तव्यामुळे राहुल गांधी पुन्हा भाजप आणि इतर हिंदुत्ववादी पक्षांच्या टीकेच्या रडारवर आले आहेत.

Spread the love