प्रभू श्री राम 21 व्या वर्षी कसे दिसायचे? हा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. आता आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सने प्रभू श्रीरामांचा तारूण्यातील फोटो तयार करून याचे उत्तर दिले आहे. एआयने दोन फोटो शेअर करत पहिल्या फोटोत प्रभू श्रीरामांच्या चेहऱ्यावरील हावभाव सामान्य आहेत. तर दुसऱ्या फोटोत ते स्मित हास्य करताना दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
प्रभ श्रीरामांचे मनमोहक रूप पाहून सगळेच भारावले आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की इतके सुंदर रूप आतापर्यंत पृथ्वीवर पाहिले नाही. इंटरनेट युजर्संना हे फोटो फार आवडेल. युजर्स यावर बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत. एवढेच नाही तर त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो शेअर करत युजर्स लिहीतात की, वाल्मिकी रामायण, रामचरितमानसबरोबर ग्रंथामध्ये केलेल्या वर्णनाप्रमाणे एआयने हा फोटो तयार केला आहे. यानुसार प्रभू श्रीराम वयाच्या 21 व्या वर्षी ते असे दिसत होते.

एका युजरने लिहीलेय की, जर आर्टिफिशल फोटो इतका सुरेख आहे, तर ते प्रत्यक्षात कसे दिसत असतील. तर अन्य एका युजरने वाल्मिकी रामायण आणि रामचरितमानससहित सर्व ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार हा फोटो बनवण्यात आला आहे. बऱ्याच लोकांनी या फोटोवर जय श्रीराम लिहीले आहे. यासोबत लोकांनी जय सिया रामही लिहीले आहे. याव्यतिरिक्तही बऱ्याच लोकांनी या फोटोंवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
प्रभ श्रीरामांचा हा व्हायरल फोटो कोणी बनवला आहे याबाबत अद्याप माहिती नाही,. हे फोटो बनवण्याऱ्या व्यक्तीबाबत काही माहित नसले तरी लोकं मात्र त्या फोटोंचे कौतुक करत आहे. एका युजरने लिहीलेय, नावाप्रमाणेच सुंदर राम आहेत, अलिकडे एआयचे फोटो ,सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.











