भुसावळ :- आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरम (एव्हीएमएफ) च्या वतीने मा.महामहीम राष्ट्रपती यांना प्रांत अधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.
त्यावेळी फोरमचे केंद्रीय महासचिव प्रकाश सरदार, जळगांव जिल्हा अध्यक्ष दिनेश इखारे, उतर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिल आराक , जिल्हा सचिव रमेश खंडारे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश तायडे,भुसावळ तालुका अध्यक्ष चंद्रशेखर निकम, सुमित निकम यांच्या सह्या आहेत. निवेदनात म्हटले आहे की, परभणी येथे राज्य घटनेची विटंबना केली. त्यांची न्यायालिन समिती मार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच त्या आरोपीसह मुख्य सूत्रदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
पोलिसांच्या मारहाणीमुळे न्यायालिन कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ व्यकंट सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषी पोलीस अधिकारी व पोलिसावर खुनाचा गून्हा दाखल करण्यात यावा. सदर निवेदनावर कोणतीही कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.