हेमकांत गायकवाड
चोपडा : पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित ,पंकज कला व विज्ञान महाविद्यालय येथील क्रीडा संचालक प्रा.डॉ.विजय पाटील यांना क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हॉकीचे जादूगार व भारताचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चेतना क्रीडा सन्मान 2021 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
पुरस्कार वितरण सोहळा चेतना व्यसनमुक्ती केंद्र जळगाव येथे मा.आमदार सुरेश भोळे, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक मा.नितीन विसपुते,सौ.देवयानी भोयर, मानसोपचार तज्ञ डॉ.सौ.अनघा चोपडा, प्रवीण पाटील यांच्या उपस्थितीत चेतना क्रीडा सन्मान २०२१ पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुरस्कार मिळाल्याबद्दल पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, संचालक भैय्यासाहेब पंकज बोरोले, संचालक मंडळ,सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर पाठक, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.












