आज दि.27 फेब्रुवारी 2022 रविवार रोजी संपूर्ण देशात पल्स पोलीओ (Pulse Polio) अभियान रबविण्यात येत आहे प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center) तालुक्यातील नशिराबाद कार्यक्षेत्रात 33 बुथ व 2 मोबाईल टीम च्या माध्यमातून 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकाना पोलीओ डोस पाजन्यात येणार आहे.
येथील उपकेंद्र क्र. 1 येथे जिल्हा परिषद उपाअध्यक्ष लालचंद पाटील यांचे हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
एकही बालक पोलीओ डोस पासुन वंचित राहणार नाही यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.इरेश हेमंत पाटील यांच्या तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. मोहिमेच्या यशस्वीते साठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सामुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य साह्ययिक, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका प्रयत्नशील आहेत.












