पुणे – रेल्वे स्थानक परिसरातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून आठजणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर कालावधीत वानवडी परिसरात घडली आहे.
याप्रकरणी १३ वर्षीय पिडीत मुलीने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी ३१ ऑगस्टला गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानक परिसरात एकटी आली होती. त्यावेळी आरोपींनी तिला आता गाडी नाही, तू गावी कशी जाणार असे म्हणत आम्ही तुझी राहण्याची व्यवस्था करतो, असे सांगून रेल्वे स्थानकाबाहेर आणले.
त्यानंतर तिचे रिक्षातून अपहरणकरून वानवडी परिसरात नेले. त्याठिकाणी आरोपींनी रात्री तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशीही आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वानवडी पोलीसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे.
पीडितेला रूग्णालयात दाखल केले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि तिची प्रकृती स्थिर असल्याचे वानवडी पोलिसांनी सांगितले.