भुसावळ – येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत ईनव्हरटर किंवा जनरेटर नसल्याने विजपुरवठा खंडित झाल्यावर खातेदारांची गैरसोय होत असल्याचे सांगितले जात आहे. दि २७ जुलै रोजी दुपारी बारा वाजता विजपुरवठा खंडित झाला असता बराच काळ विज न आल्याने जेष्ठ नागरिकांनी जनरेटर किंवा ईनव्हरटर सुरू करा असे व्यवस्थापक यांना सांगितले असता बॅंकेच्या शाखेत अशी सुविधा नसल्याने व्यवस्थापक हतबल झालेले दिसले.
त्यामुळे जेष्ठ नागरिकांना पैसे न काढता रिकाम्या हाताने घरी परत जावे लागले.त्यामुळे लवकरात लवकर येथे ईनव्हरटर किंवा जनरेटर ची सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जेष्ठ नागरिकांनी केली आहे.