धरणगाव – शेतातील मंदिरात मुंजोबा देवाच्या पाया पडण्याच्या बहाण्याने घेऊन जात दिव्यांग पतीला विहिरीत ढकलून पत्नीनेच खून केल्याची खळबळजनक घटना दि. 12 जून रोजी धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडली आहे. प्रकाश यादव धोबी (सुर्यवंशी) वय 36, रा. भवरखेडा ता. धरणगाव), असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित आरोपी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन शिवाजी धोबी (रा.भवरखेडा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि.12 जून रोजी दुपारी 1 ते 3 वाजेच्या दरम्यान, संशयित आरोपी पत्नी ज्योती प्रकाश धोबी ही पती प्रकाश धोबी यांना गोविंदा शालिक पाटील यांच्या शेतातील मुंजोबाचे मंदिरात पाया पडण्याच्या बहाण्याने शेतात घेऊन गेली. पतीच्या अपंगत्वाचा फायदा घेवून त्याला विहिरीत ढकलून देवून मारुन टाकले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित आरोपी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले हे करीत आहेत.