धक्कादायक ; जमावाकडून दुचाकी पेटवून मद्यधुंद तरुणाला जाळण्याचा प्रयत्न

0
42

जळगाव – पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून १६ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रकार लहान बहिणीने आराडाअोरड केल्याने टळला. जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरात शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे संतप्त जमावाने मद्यपी तरुणाची तिथेच धुलाई करून त्याची मोटारसायकल पेटवून देत त्याला जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्याची सुटका केली. या प्रकरणी रात्री उशिरा बाल लैगिंक अत्याचार कायद्यान्वये तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भरत सुभाष सूर्यवंशी (३४, रा. चंदुअण्णा नगर) असे तरुणाचे नाव असून तो निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे.

शहरातील कोल्हे हिल्स परिसरात मजुरी काम करणारे पती पत्नी हे शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मासे पकडण्यासाठी गेले होते. तर दोन्ही मुले बकऱ्या चारण्यासाठी गेल्या असताना घरी १६ वर्षीय मुलगी ६ वर्षीय बहिणीसोबत होती. त्यावेळी भरत हा घरात घुसला आणि त्याने पाणी मागितले. पीडित मुलगी पाणी आणण्यासाठी आत गेली असता भरतही तिच्या मागे गेला. आत जाताच त्याने तिला ↑माझ्याशी दोस्ती कर, असे म्हणाला. तिने नाही म्हणून तुम्ही आत का ? आलात असे विचारले. तेव्हा भरत याने तिचे दोन्ही हात पकडून तिला पलंगावर अोढले. तिचे कपडे फाडण्यास सुरुवात केली. या वेळी आवाज ऐकून लहान बहीण तेथे आली. तिला भरत याने हाताने दूर लोटून मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिन प्रतिकार केला असता तिच्या उजव्या गालाला चावा घेतला.

लहान बहिणीची आरडाओरड

लहान बहिणीचा आवाज ऐकून ६० जणांचा जमाव गोळा झाला. जमावाने मुलीच्या घरात जावून पाहिले तर मद्यपी भरत पीडितेशी अंगलट करताना आढळला. जमावाने त्याला बाहेर अोढून बेदम मारहाण केली. तो शिवीगाळ करत होता. जमावाने त्याची दुचाकी पेटवून देत त्यालाही जळत्या गाडीवर टाकण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी त्यांना आवरून पोलिसांना बोलावले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Spread the love