जळगाव – जिल्ह्यात पुन्हा एकदा हत्येची घटना समोर आली आहे. विशेष यात पोटच्या मुलानेच वडिलांची लोखंडी कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. ही घटना यावल तालुक्यातील पिळोदा येथे घडली असून रतन तानसिंग कोळी वय-७३ असं यातील मयत वडिलांचे नाव आहे.
याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नेमकी घटना काय?
यावल तालुक्यातील पिळोदा येथे रतन कोळी हे पत्नी शुबाबाई कोळी आणि मुलगा देवानंद कोळी यांच्यासोबत वास्तव्याला होतो. नेहमीप्रमाणे रविवारी १४ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता घरी झोपलेले असतांना मुलगा देवानंद कोळी याने माझे लग्न लावून देत नाही, किंवा लग्नासाठी पैसे देत नाही असे वडील रतन कोळी यांना सांगून वाद घातला. याकडे वडील रतन कोळी यांनी टाळाटाळ केली.
याचा राग असल्याने संतापाच्या भरात घरात असलेली लोखंडी कुऱ्हाडीने झोपलेले असतांना वडील रतन कोळी यांच्यावर वार करून खून केला. याबाबत संशयित आरोपी देवानंद कोळी याला अटक करण्यात आली. याप्रकरणी शबाबाई कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा देवानंद कोळी याच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पिळोदा गावात घटनास्थळी फैजपुरच्या डीवायएसपी अन्नपुर्णा सिंह यांच्यासह पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्यासह पोलीस पथकाने भेट दिली असून पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.