रावेर प्रतिनिधी- राजेंद्र महाले- रावेर तालुक्यातील तासखेडा येथून लघुपाटबंधारे विभागाचा कालवा (पाट) जात कालव्याच्या संरक्षण भिंतीची माती मोठ्या प्रमाणात जेसीबी मशिंनच्या साहाय्याने उदळी पासून ते तासखेड्या पर्यंत मोठ्या प्रमाणावर अवैधपणे माती उत्खनन करण्यात आले आहे तसेच तासखेड्याच्या पुढेही असे उत्खनन केलेले असून पाटाची संरक्षक भिंत कोरण्यात आली आहे ,महसूल विभाग व लघुपाटबंधारेमार्फत कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना अगदी खुलेआम मातीची उत्खनन व वाहतूक केली जात आहे.या बाबत तक्रार करण्यात आलेली असून काय कारवाई केली हे अद्याप स्पष्ट झालेली नसून कारवाई कधी होणार आहे याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे
या गंभीर प्रकाराकडे पाटबंधारे विभागासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी हितसंबंधातून तर दुर्लक्ष करीत नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, पाटाच्या संरक्षण भिंतीच्या मातीचे अवैध उत्खनन होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
अवैध माती उत्खनन केले बाबत कारवाई करणेसाठी रावेर तहसीलदार यांना दि. 24/01/2023 रोजी ग्रामीण पत्रकार संरक्षण समितीतर्फे लेखी निवेदन देण्यात आले आहे. तसेच आज पावेतो महसूल विभागामार्फत संबंधितावर काय कारवाई केली? किंवा कार्यवाही न करण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण तर झाली नाही ना? तसेच राजकीय दबाव तर येत नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.