वन्यप्राणी संरक्षक कायदाच रद्द करा रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेची मागणी

0
13

हेमकांत गायकवाड

चोपडा -सरकारने शेतकऱ्यांना भीतीदायक स्थितीत शेती करण्यास भाग पाडणारा वन्य प्राणी संरक्षक कायदाच रद्द करावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे.

जळगाव जिल्ह्यात बिबट्यांची उत्पत्ती पाहता अन्नाच्या शोधात जंगल सोडून शेतांमध्ये वावरत आहेत शेतकऱ्यांच्या मनात भितीदायक वातावरणात काम करण्याची स्थिती शेतकऱ्यांवर आलेली आहे त्यात हरण व रान डुक्कर यांच्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान सहन करावे लागत आहे.

शासनाच्या वन्य प्राणी संरक्षण कायदा असल्यामुळे शेतकऱ्यांना प्राण्यांवर हल्ला करता येत नाही मात्र मागील काही वर्षांपासून बिबट्यांनी शेतकऱ्यांवर हल्ला करून घायळल केलेला आहे काही शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे शेतात मजूर कामाला यायला तयार नाहीत बिबट्या मादी वर्षातून चार पिलांना जन्म देते व वयाच्या चाळीशी पर्यंत पिलांना जन्म देत असते त्यात नवीन जन्माला घातलेले मादी बिबट्या वर्षातून दोनदा पिलांना जन्म देतात यांचा गुणाकार केला तर काही दिवसात प्रत्येक शेतात शेतात बिबटे दिसतील व शेतकऱ्यांना निशस्त्र यांचा सामना करावा लागेल एक दिवस शेतकरीच त्यांचे खाद्य बनवून देईल असे असतानाही शासनाने वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करावा अन्यथा शेतकऱ्यांना शस्त्र परवाना द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना बिबट्या पासून स्वतःचे संरक्षण करता येईल तसेच हरण रान डुक्कर गवा नीलगाई हे वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या शेतात अतोनात नुकसान करत असतात त्यांचाही बंदोबस्त वन विभागाने करावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संदीप पाटील जळगाव जिल्हा अध्यक्ष संजय महाजन जिल्हा उपाध्यक्ष किरण गुजर सचिन शिंपी अखिलेश पाटील विनोद धनगर खुशाल सोनवणे नंदलाल पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे.

Spread the love