चोपडा: यावर्षी इ पीक पाहणी ॲप मुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा पिक पेरा नोंदणीस उशीर होत आहे बऱ्याच शेतकऱ्यांना ई पिक पाहणी नोंद करताना अडचणी येत आहे त्यातल्या त्यात यावर्षी भरडधान्य शासकीय नोंदणी लवकर सुरू करण्यात आली त्यामुळे बरेच शेतकरी शासनाच्या या योजनेचे लाभ घेण्यापासून वंचित राहिलेले आहेत मध्यंतरी मुदतवाढ मिळाली मात्र थोडक्यात होती बारा तारखे पासून महाराष्ट्रातील तलाठी संपावर गेल्यामुळे बरं शेतकऱ्यांचा पिक पेरा लागलेला नाही व ज्यांच्या ला गेला आहे त्यांना पिक पेरा लावलेला उतारा मिळण्यास अडचणी येत आहेत शासनाने शेतकऱ्यांची ही अडचण पाहता भरड धान्य नोंदणीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते संदीप पाटील जिल्हाध्यक्ष संजय महाजन उपजिल्हाध्यक्ष किरण गुजर तालुकाध्यक्ष सचिन शिंपी वैभव शंखपाळ नामदेव महाजन पाचोरा अखिलेश पाटील भडगाव सुनील पाटील पाचोरा देवेंद्र पाटील चोपडा विनोद धनगर अजित पाटील राहुल पाटील प्रदीप पाटील आदी जिल्हाभरातील शेतकऱ्यांची ही मागणी आहे.