राहुल गांधींच्या कारवर दगडफेक; बिहारमध्ये भारत जोडो न्याय यात्रेत गोंधळ

0
44

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सध्या बिहारमध्ये असून पं. बंगालमध्ये प्रवेश करणार आहे. या यात्रेदरम्यान मोठा गोंधळ झाला असून राहुल गांधी यांच्या कारवर दगडफेक झाल्याची माहिती आहे.

यातून राहुल गांधी थोडक्यात बचावले आहेत. त्यानंतर ते कारमधून उतरून बसमध्ये बसले आणि पोलिसांनी जवावाला शांत केलं.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज 18 वा दिवस आहे. त्यांची यात्रा बिहारमधून बंगालमध्ये दाखल होणार आहे. राहुलच्या या प्रवासात मिरचाईबारी डीएस कॉलेजमार्गे लाभा येथील जाहीर सभेनंतर ते बंगालला रवाना होतील. बुधवारी त्यांनी कटिहार येथे पदयात्रा केली आणि लोकांना अभिवादन केलं.

Spread the love