निंभोरा येथील राजीव बोरसे, विवेक बोंडे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

0
10

प्रतिनिधी – राजेंद्र महाले

 

रावेर – जळगाव येथे अल्पबचत भवनात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा जळगाव तर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात निंभोरा कृषी तंत्र विद्यालयाचे उपप्राचार्य श्री. विवेक प्रल्हाद बोंडे यांना राज्यस्तरीय कृषी सेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच निंभोरा येथील जेष्ठ पत्रकार श्री राजीव तुकाराम बोरसे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांच्या शुभ हस्ते स्मृति चिन्ह व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद साहेब, फैजपुर येथील सतपंथ मंदिराचे गादिपती महामंडलेश्वर श्री जनार्धन हरिजी महाराज, पत्रकार अधीस्वीकृती राज्य अध्यक्ष श्री यदु जोशी, पत्रकार संघ राज्यध्यक्ष श्री वसंतराव मुंडे, अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री डिगंबर महाले, उत्तर महाराष्ट्र पत्रकार संघ अध्यक्ष श्री प्रवीण सपकाळे, व पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष श्री संतोष नवले यासह आदी मान्यवर व पत्रकार बांधव उपस्थित होते. बोंडे यांनी आधुनिक शेती क्षेत्रात मोलाचे कार्य केल्याने तसेच बोरसे यांनी पत्रकारी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याने या दोघांच्या कार्याची नोंद पत्रकार संघाने घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बोंडे व बोरसे यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन मान्यवरांनी केले आहे.

Spread the love