हेमकांत गायकवाड
चोपडा : येथील राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सचिवपदी वाळकी माध्यमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका व बोरोलेनगर निवासी सौ मनिषा वासुदेवराव पाटील यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे . सदर नियुक्तीचे पत्र राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या शहर अध्यक्षा योगिता नरेंद्र पाटील व तालुकाध्यक्षा भारती राजेंद्र पवार यांनी त्यांना दिले आहे .
राजमाता जिजाऊ ब्रिगेड हि संस्था महिलांच्या सक्षमीकरण , सबलीकरनाच्या उदात्त हेतू , महिलांमधील कलात्मक गुण , आत्मनिर्भरता , स्वाभिमान , धाडसपणा , अन्यायाच्या विरोधात लढणारी व रस्त्यांवर उतरून आपले वैचारिक , सक्षम व चाकोरीबद्ध उपक्रम राबविणारी ही सामजिक व सांस्कृतिक व कल्याणकारी उपक्रम राबविणारी संघटना आहे.
सौ मनिषा वासुदेवराव पाटील यांच्यात असलेल्या संघटनातमक कलागुण , छंद , वक्तृत्वाची परमेश्वरी देण व लढवय्या बाणा या साऱ्या बाबींचा विचार करून सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
सौ मनिषा वासुदेवराव पाटील ह्या उपक्रमशील शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात . तसेच महिलांसाठी विवीध उपक्रम व कार्यक्रम त्या नेहमीच आयोजित करीत असतात .त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व व कामगिरीबद्दल त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे …