प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – येथे सालाबादप्रमाणे यंदाही ५ व्या वर्षी ग्रामस्थांच्या सहकार्याने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून दि.८ ते १५ डिसेंबर या कालावधीत संगीतमय भावार्थ रामायण कथा अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून कथा प्रवक्ते संतचरणदास हभप तुळशीदास महाराज नांदेडकर (देवाची आळंदी) हे राहणार आहेत. त्यांच्या सोबत साथसंगीत गायनाचार्य हभप काशिनाथ महाराज डांभुर्णी, हभप सुधाकर महाराज नशिराबाद ,आँर्गन हभप भगवान महाराज पाचोरा ,तबला वादन हभप प्रणव महाराज , रामायण झाँकी हभप गोटू महाराज नेमाडे भुसावळ , काकडा व हरीपाठ हभप रितेश महाराज कुंड ,हभप पद्माकर महाराज कुंड ,हभप राजीव महाराज हरणखेड हे राहणार आहेत .
दररोज सकाळी काकडा आरती ,विष्णूसहस्रनाम , संध्याकाळी हरीपाठ तसेच सकाळी ८:३० ते ११ व रात्री ७:३० ते १० अशा वेळेत संगीतमय कथा होणार आहे तसेच दि.१५ रोजी सकाळी १० ते १ यावेळेत महाप्रसाद संध्याकाळी दिंडी सोहळा , भारुड व रात्री ८ ते १० काल्याचे किर्तन होणार असून भाविकांनी या अखंड हरीनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.