राणा दांपत्यावर राजद्रोहाचा गुन्हा; 29 एप्रिलपर्यंत जेलमध्ये

0
13

‘मातोश्री’वर येऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे सांगणाऱया नवनीत आणि रवी राणा या दांपत्याविरोधात भादंवि कलम 124 ‘अ’नुसार राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारविरोधात प्रक्षोभक विधाने करणे आणि सरकारला आव्हान देणे यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला. राणा दांपत्याला आज वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायाधीश ए. ए. घनिवले यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

शुक्रवारी त्या दोघांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. नवनीत यांची भायखळा जेलमध्ये तर रवी राणा यांची आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, या दांपत्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

Spread the love