राऊतांनी केलेल ‘ते’ ट्विट भोवलं; बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
38

बार्शीतील अल्पवयीन पीडितेचा फोटो ट्विट करणे खा. संजय राऊत यांना चांगलंच भोवलं आहे. राऊत यांनी ट्विट केलेल्या फोटोमुळे पीडितेची ओळख पटत असल्याने राऊत यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 मार्च रोजी बार्शीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. मात्र, या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असल्याने संजय राऊत यांनी या पीडित मुलीचा फोटो ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. या फोटोत मुलीची ओळख पटत असल्याने राऊत यांच्याविरोधात पोक्सो 23, जुवेनाईल जस्टीस 74, आयपीसी 228 अ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राऊतांनी काय ट्विट केलं होतं?

बार्शीतील पीडित मुलीचा फोटो शेअर करत “देवेंद्रजी हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही, म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजप पुरस्कृत गुंडांनी हा हल्ला केला आहे. 5 मार्चला हा हल्ला झाला आहे. आरोपी अद्याप मोकाट आहेत”, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

Spread the love