प्रतिनिधी – राजेंद्र महाले
रावेर – तालुक्यातील सिंगत शिवारातील आंदलवाडी या गावी जाणाऱ्या शेत रस्त्यावर आज सकाळी ८.०० वाजताच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी एका इसमाचे प्रेत आढळून आल्याने या परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.तसेच मयत व्यक्तीच्या नावा गावाबाबत तपास करता मयत व्यक्ती कैलास भिका पाटील वय ४० रा. पिंपरीसेकम ता.भुसावल येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाल्याने मयताची आई प्रमिलाबाई भिका पाटील यांनी निंभोरा पोलिस स्टे.ला येवून मयत यास आरोपी याने दगडाने मारून व जाळून जीवे ठार पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला याबाबत फिर्याद दिल्याने निंभोरा पोलिस स्टेशनला भाग५ गुरन ८९/२०२२ भादंवि कलम ३०२,२०१प्रमाणे आज दुपारी१२:४४ वा.गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर उपविभाग पोलिस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलिस स्टे.चे एपीआय गणेश धुमाळ हे करीत आहे.












