रावेर :- भारतीय बौद्ध महासभाचे कार्यअध्यक्ष डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशा नुसार जळगाव पूर्व शाखेच्या अंतर्गत रावेर तालुका शाखा व शहर शाखा माध्यमातून रावेर येथील बुद्धनगरी, स्टेशन रोड, सामाजिक सभागृह येथे येणाऱ्या १७ मे २०२४ ते २६ मे २०२४ या कालावधीत १० दिवसीय नुकतेच श्रामणेर/ बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर सपंन्न झाले. त्या शिबिराचा सांगता समारोप दिनांक: २६ मे २०२४ रोजी ठिक दुपारी २. ३० वाजता पुज्य भंतेजी दिपंकर महाथेरो व शिबीराचे प्रमुख मार्गदर्शन आयु . प्रकाश सरदार गुरुजी तसेच जिल्हा कार्यकारणीच्या प्रमूख उपस्थीत मा. जिल्हा अध्यक्ष आयु. रविंद्रजी वानखेडे, जिल्हा सरचिटणीस आयु. सुशिलकुमार हिवाळे, कोषाध्यक्ष शैलेन्द्र जाधव, केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे,जिल्हा संघटक विजय अवसरमल, केंद्रीय शिक्षक विजय भोसले, राज्य संघटक लता तायडे, जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार, भुसावळ तालुका अध्यक्ष उत्तम सुरवाडे, रावेर तालुका अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, शहर अध्यक्ष राहुल गाढे, गौतम अटकाळे, ले.कर्नल युवराज नरवाडे, संजीवकुमार साळवे,महेंद्र वानखेडे, संतोष वानखेडे, महेंद्र तायडे,सर्व जिल्हातील प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांच्या तसेच भारतीय बौध्द महासभा जळगाव (पू) जिल्हा शाखाचे, सर्व तालुका शाखा पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक/शिक्षिका, बौद्धाचार्य, माजी श्रामणेर, समता सैनिक दल सर्व सैनिक यांच्या उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रम
रावेर तालुका व शहर शहर शाखा यानी यशस्वीते साठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विजय अवसरमल यानी केले.