जळगाव (प्रतिनिधी) आजच्या तरूणांमध्ये धार्मिक गुण अंगी जोपासला पाहिजे कारण आपण काय करतो तरूणपणामध्ये अर्धा आयुष्य वेळे अभावी गमवून बसतो आणी जेव्हा काठी टेकायला येतो तेव्हा आपल्याला देव दिसतो.जर मुलांवर किंवा परीवारावर धार्मिकसह चांगले संस्कार दिले तर नक्की त्यांचे भविष्य उज्वल होवू शकते असे प्रतिपादन दैनिक साईमतचे उपसंपादक शरद भालेराव यांनी केले.
शहरातील पिंप्राळा परीसरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिरात दैनिक साईमतचे उपसंपादक शरद भालेराव व रेखा भालेराव यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी धनंजय सोनार, मधुकर ठाकरे, देविदास पाटील, सरदार पाटील, विजय भावसार, कैलास कोळी, संजय भोई, प्रकाश कदम, सुर्यकांत पारखे, हेमराज गोयर,नरेश बागडे, मनिषा चव्हाण, योगिता पाटील, ज्योति भावसार, सविता पाटील, नंदिता जोशी, आदि भाविक उपस्थित होते.











