निकालापूर्वी चाळीसगावात झळकले विजयाचे बॅनर; आमदार चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

0
30

जळगाव – विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे. मात्र चाळीसगाव भाजप कार्यकर्त्यांकडून निकाल लागण्यापूर्वीच विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार मंगेश चव्हाण यांच्या समर्थकांनी हे विजयी फ्लेक्स लावण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर उद्या (२३ नोव्हेंबर) मत मोजणी होणार आहे.यानंतरच विजयाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र काही ठिकाणी निकलापूर्विच बॅनर लावण्यात आल्याचे पाहण्यास मिळत आहे.

चाळीसगाव विधानसभेत भाजपचे मंगेश चव्हाण विरुद्ध शिवसेना उबाठाचे उन्मेश पाटील यांच्यात थेट सामना रंगला होता. मात्र मंगेश चव्हाण आमदार पदी पुन्हा एकदा नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदनाचे बॅनर शहरात झळकले आहेत. निकालाला एक दिवस बाकी असताना कार्यकर्त्यांचा उत्साह शिंगेला पोहचला असून भाजप युवा मोर्चाकडून शहरात हे बॅनर लावण्यात आले आहेत.

तालुक्यात रंगली चर्चा

संपूर्ण जिल्ह्यासह तालुका वासियांचे या निकालाकडे लक्ष लागले आहे. असं असताना निकालापूर्वीच मंगेश चव्हाण यांचे विजयाचे बॅनर झळकल्याने तालुक्याभरात चर्चा सुरू झाले आहे.

Spread the love