जळगाव -: येथील कांचन नगरातील काँक्रिटी करणाचे रोड हे १०० कोटी निधी अंतर्गत मंजुर असुन सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी गेल्या दोन वर्षा पासून या परिसरातील काँक्रीटी करणाचे रस्ते हे पूर्ण झालेली नाहीत. कांचन नगरातील जागृत गुरुदत्त मंदिराची गल्ली व दत्त मंदिराची मागील बाजूची गल्ली, साईबाबा मंदिर मागील गल्ली या गल्लीचे काँक्रीटी करणाचे काम बाकी आहे. सदरहू रस्त्याचे काम व्हावे म्हणून अखिल महाराष्ट्र कामगार संघटना, जळगाव व परिसरातील नागरिक दिनांक ७ मार्च २०२५ रोजी आमरण उपोषणाला बसणार होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी उविज/५६१/२०२५ दिनांक ०५/०३/२०२५ रोजी पत्र देऊन काँक्रिटी करणाचे रोडाचे काम प्रारंभ करतो म्हणून पत्र देऊन कळविले. त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले. रस्त्यांचे कामाला सुरुवात केली परंतु रस्ते पूर्ण केले नाहीत, नागरिकांची दिशाभूल व फसवणूक केली असे कृत्य सार्वजनिक बांधकाम विभागाने केले, सदरहू रस्त्यात कांचन नगरातील जागृत गुरुदत्त मंदिराचा गल्लीचाहि समावेश आहे. दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जयंती असल्याने दत्त जयंती पूर्वी जर दत्त मंदिराचा गल्लीचा रस्ता न झाल्यास दत्त मंदिर परिसरातील नागरिक व कांचन नगर परिसरातील नागरीक हे होणाऱ्या म. न. पा. निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे बाबतचे निवेदन अखिल महाराष्ट्र कामगार संघटना, जळगाव व परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी रोहन साहेब घुगे, सार्वजनिक बांधकाम विभाग, आमदार सुरेशजी भोळे, खासदार स्मिता वाघ, व मंत्रालय स्तरावर हि देण्यात आले आहेत.
निवेदन देतांना अखिल महाराष्ट्र कामगार संघटनाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र कोळी, अनिल कोळी, उमेश सपकाळे, सागर सोनवणे, गणेश तांबट, गौरव साळुंखे, तेजस कोळी, रितेश कोळी, कविता कोळी, छाया कोळी, मंगला सोनवणे, व कांचन नगरातील नागरिक उपस्थित होत.












