जळगाव : बनावट वेबसाईटवर ट्रेडिंग खाते तयार करून नफा परत करण्याच्या बहाण्याने जळगाव शहरातील मुक्ताईनगर कॉलनीतील सेवानिवृत्त एलआयसी अधिकार्याची साडे सहा लाखांत फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार वाढले
जळगाव शहरातील एसएमआयटी कॉलेजसमोर मुक्ताईनगर कॉलनी येथे चंद्रशेखर संतोषराव देशमुख (67) हे वास्तव्यास आहेत. चंद्रशेखर देशमुख यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आले. संबंधितांनी देशमुख यांचा विश्वास संपादन करत बनावट वेबसाईटवर ट्रेडिंग खात्यात तयार करण्यास सांगून सदर ट्रेंडिंग खात्यांमध्ये आभासी नफा दाखवून त्यांना त्या नफ्याच्या 50 टक्के रक्कम देशमुख यांना भरण्यास सांगितले. त्यानुसार देशमुख यांनी संबंधितांनी सांगितल्यानुसार ऑनलाईन सहा लाख 54 हजार 189 रुपये पाठवले. देशमुख यांनी संबंधितांना पैसे परत मागितले असता फोनवर बोलणार्या अनोळखींनी देशमुख यांच्या खात्यातून ऑनलाईन पैसे काढून घेतले. डिसेंबर 2020 ते 29 नोव्हेंबर 2021 या कालावधीत फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर देशमुख यांनी याप्रकरणी मंगळवार 29 नोव्हेंबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन त्यावरून फसवणूक करणार्या अज्ञात अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जळगाव सायबर सेलचे पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे व सहकारी करीत आहेत.