साकेगाव येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रुट मार्च

0
56

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – मा. पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आदेशाने दिनांक 09/11/2024 रोजी सकाळी 10:30 ते 11:30 वाजेच्या सुमारास भुसावळ तालुका पो स्टे हद्दीत विधानसभा निवडणूक 2024 अनुषंगाने तालुका पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार व CRPF कंपनी क्र. A – 240 M यांचे सह साकेगाव या गावी बस स्टॅण्ड, पवार गल्ली, भवानी नगर, पोळा मैदान, पटेल गल्ली व परत बस स्टॅण्ड असा रूट मार्च घेण्यात आला. रूट मार्च दरम्यान CRPF कंपनीचे 02 अधिकारी व 25 अंमलदार तसेच पो स्टे चे 02 पोलीस अधिकारी व 10 पोलीस अंमलदार हजर होते अशी माहिती पो. नि.महेश गायकवाड साहेब भुसावळ तालुका पोलीस स्टेशन यांनी दिली.

Spread the love